पिंपरी चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई..
प्रेस मीडिया :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस
एका टोळीने मध्य प्रदेश मधून पिंपरी चिंचवड शहर परिसरात विक्रीसाठी आणलेले १४ पिस्टल आणि ८ जिवंत काडतुसे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने रंगेहाथ पकडले आहे.यामध्ये चार जणांना अटक करण्यात आलेली आहे.आरोपी एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. वडमुखवाडी येथे काहीजण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून दरोडा विरोधी पथकाने ३ जानेवारी रोजी रात्री तिघांना ताब्यात घेतले होते. यातील एका आरोपीकडून यापूर्वी देखील २४ पिस्टल आणि १६ जिवंत काडतुसे पोलिसांनी पकडली होती.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस अंमलदार महेश खांडे, उमेश पुलगम, नितीन लोखंडे, आशिष बनकर, सागर शेडगे, गणेश कोकणे, राजेश कौशल्ये, राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, राजेंद्र शिंदे, औदुंबर रोंगे, गोविंद सुपे, नागेश माळी, पोलीस हवालदार शेटे यांच्या पथकाने केली आहे.
अटक करण्यात आलेले आकाश अनिल मिसाळ वय २१, रा. इंद्रायणीनगर, भोसरी रुपेश सुरेश पाटील वय ३०, रा. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव, ऋतिक दिलीप तापकीर वय २६ रा. सुतारवाडी, पाषाण, अजित उर्फ विकी रामलाल गुप्ता वय २८, रा. भोसरी, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
रुपेश पाटील भोसरी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यात फरार होता. तर त्याच्यावर चिंचवड, देहूरोड आणि भोसरी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी आकाश मिसाळ याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे.