प्रेस मीडिया ऑनलाइन :
मोहम्मद शुक्रुल्ला : वरिष्ठ पत्रकार :
पिंपरी चिंचवड : आजच्या जमान्यात निगडी रुपीनगर स्पंदन हॉस्पिटल समोर काका-चाचाची जोडी दिसली.आज आपण ज्या युगातून जात आहोत, त्यात जातीवाद किती प्रमाणात लोकांमध्ये भरला आहे, हे लक्षात घेता, असे तत्त्वज्ञान क्वचितच पाहायला मिळते, जिथे राम आणि रहीम एकत्र बसून गप्पागोष्टी करताना दिसतात. 26 जानेवारीच्या पूर्व संध्येला 2022 च्या सुंदर फोटोमध्ये आपण हे दृश्य पाहू शकतो. या दोन्ही समाजातील ज्येष्ठांना एकत्र बसलेले पाहून आजही भारताची झलक पाहायला मिळते.
हा फोटो आज 25 जानेवारी 2022 संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घेतला आहे. प्रेस लाईव्हचे प्रतिनिधी मोहम्मद शुक्रुल्ला आणि वाजिद कमाली यांनी रस्त्यावरून जात असताना हा फोटो काढला होता. ज्या मध्ये गंगा जमुनी तहजीब अजूनही स्पष्टपणे दिसत आहे.