विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी संभाषण कौशल्य कार्यशाळेचे आयोजन.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :
पुणे अमर एज्युकेशन सोसायटी ,संचलित एस.पी.इंटरनँशनल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी संभाषण कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
फिनिक्स फांऊडेशन,पुणे या संस्थे ची स्थापना १२/१२/२०१९ झाली होती , उत्तम उत्तम कामगिरी करत या संस्थेने शिक्षण जगतामध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षरांमध्ये प्रस्थापित केलेले आहे संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक प्रा.अच्युतराव निंंबाळकर यांनी या वेळी विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी भाषेत संभाषण, कौशल्य, शिकवून तसेच दैनंदिन व्यवहारात इंग्रजीचा वापर कसा करायचा याचा ही अगदी सुंदर व छान अनुभव सोप्या पध्दतीत सांगून त्याच्या कडून इंग्रजीत संवाद करवून घेतला .
फिनिक्स फांऊडेशनच्या विश्वस्त प्रा.सौ.स्मिता तलाठी यांनी या कार्य शाळेचे आयोजन केले होते .