सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी रोकठोक मीडिया वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
प्रेस मीडिया ऑनलाईन
पुणे जिल्हा प्रतिनिधी :अन्वरअली शेख
पिंपरी; दि ११.पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य मीडिया समूह रोखठोक चा आज आठवा वर्धापनदिन सोहोळा मोठ्या उत्साहात व थाठात संपन्न झाला. आठव्या वर्धापनदिनाच्या शुभप्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी रोकठोक मीडिया वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
आज दहा वर्षानंतर पत्रकरिता क्षेत्रात पाय ठेवू पाहणाऱ्या नवीन पत्रकारांसाठी रोखठोक मीडिया हे एक लक्ष्य आणि गणेश हुंबे हे एक आदर्श बनले आहेत . कसे करायचे आहे ? तर रोखठोक मीडिया सारखे ; आणि काय व्हायचे आहे ? तर गणेश हुंबे , असे उत्तर आजच्या नवीन पत्रकारांकडून ऐकायला मिळते . हा असा मैलाचा दगड गणेश हुंबे आणि रोखठोक वृत्तसमूहाने रचून ठेवला आहे .
यामागे असणारे अपार कष्ट , नाविन्याचा ध्यास , दूरदृष्टी , गौर-गरिबांना न्याय मिळउन देण्याचे ध्यय,खर्याला खरं व खोट्याला खोटं ठरवणारं काळीज, आणि परिवर्तन घडवण्यासाठी धोका पत्करण्याची तयारी हे गुण अंगी असण्याची गरज आहे . खरचं रोखठोक वृत्त आणि गणेश हुंबे यांच्या संघर्षमय प्रवासाचा आज सर्वच क्षेत्रात कौतुक होत आहे. रोकठोक वृत्त बद्दल प्रेस मीडिया लाईव्ह समूह व मुख्य संपादक मेहबूब सार्जे खान यांना फार अभिमान आहे . रोखठोकचा हा प्रवास असाच अविरतपणे व अखंडपणे सुरु राहावा यासाठी मनोकामना व येणाऱ्या काळात नवीन पत्रकारांना आपला संघर्ष प्रेरणादायी व आदर्श ठरावा वर्धापन दिनाच्या शुभप्रसंगी प्रेस मीडिया लाईव्ह समूहाकडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
सदर समारंभ ब्ल्यू वॉटर हॉटेल , रावेत औंध बीआरटी रोड पुणे येथे ठेवण्यात आला होता. या समारंभास सर्वच क्षेत्रातील मान्यवर , पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोख ठोक चे संपादक श्री गणेश नवनाथ हुंबे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.