महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर

 आगळ्या वेगळ्या पद्धतीने नागरिकांची भावी इच्छुक असलेल्या नगरसेवकांना मागण्या


प्रेस मीडिया ऑनलाईन

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस


पिंपरी चिंचवड दि २३. महानगरपालिकेची निवडणूक जस जसी जवळ येत आहे. राजकीय पक्ष, कार्यकर्ते, व अन्य इच्छुक भावी नगरसेवक  पदाधिकारी यांच्या हालचाली जोमात सुरू होताना दिसत आहे. नागरिकांमध्ये देखील निवडणूकीचा उत्साह व आता आपली बाजू मांडण्याची नवीन नवीन पद्धत दिसून येत आहे. अशात आगामी निवडणुकीच्या तोंडावर वाकड परिसरात लावण्यात आलेले हटके फ्लेक्स बाजी पूर्ण पिंपरी चिंचवडकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.

भुजबळ चौक, वाकड येथे  फ्लेक्स लावण्यात आले आहेत. आम्हाला नवीन प्रसूतीगृह बांधून देणारा नवीन नगरसेवक हवा आहे

, होय मी गरीब महिला बोलतेय.

 *चिल्ड्रन्स पार्क बांधून देणारा नगरसेवक हवा, होय मी लहान मुलगा बोलतोय.*

’ ‘नवीन प्ले ग्राऊंड बांधून देणारा नगरसेवक हवा, होय मी खेळाडू बोलतोय.’ असे नागरिकांकडून विविध मागण्यांचे मजकूर या फ्लेक्स वरती झळकत आहे.

फ्लेक्सच्या माध्यमातून नवीन गार्डन, नाना नानी पार्क, फुटपाथ, प्रेक्षागृह , रस्ते, दावाखने, संस्कतिक भवन , परिसरात स्वच्छता,अशी विविध मागण्या पूर्ण पिंपरी चिंचवड मधे झाली पाहिजे अशी नागरिकांमध्ये जागृती अभियान जणू उभा राहताना दिसत आहे, प्रभाग क्र.१६ मधे नागरिक वाकड येथील फेलक्स बद्दल चर्चा करताना व आपल्या देखील प्रभागातील प्रमुख समस्यांना आजी माजी जनप्रतीनिधी यांच्या समोर मांडल्या पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रभागात उमटत असल्याची चुणूक भासत आहे.

निवडणुकीच्या तोंडावर लावण्यात आलेले हे फ्लेक्स सध्या चर्चेचा विषय पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये होत आहे. नव्यानं निवडणूक लढवणा-या नगरसेवक पदाच्या उमेदवारांकडे नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.दरम्यान, अशा प्रकारे उभारण्यात आलेले हे फ्लेक्स कुणी लावले आहेत याबाबत माहिती मिळू शकली नाही.परंतु आता पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये असे फ्लेक्स झळकवण्यास नागरिकात जणू उत्सहाच दिसून येत आहे.


जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क : 

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : 

 पठाण एम एस 94232 49331,9975071717

Post a Comment

Previous Post Next Post