रिक्षावाले व प्रवाशी गॅसवर..
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड शहरात व परिसरात सीएनजी गॅस पंपावर ऑटो रिक्षा आणि टॅक्सी वाहतूक करणाऱ्या व खासगी गाडीत गॅस भरण्यासाठी रांगाच रांगा लागल्या दिसून आले. प्रेस मीडिया लाईव्ह चे प्रतिनिधी यांनी किवळे रावेत येथे सीएनजी पुरवठा करणाऱ्या कंपनी चे पंपावरील ऑपरेटर यांनच्याकडून माहिति घेतली असता त्यांच्या कडून अशी माहिती मिळाली की ६ जानेवारी २०२२ पासून ११ जानेवारी २०२२ पर्यंत मुख्य गॅस वाहिनीचे दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे आम्हाला मोबाईल वर कंपनीचा संदेश आला आहे म्हणून ६ जानेवारी पासून सर्व गॅस पंप बंद राहणार आहेत.
तेथील काही रिक्षचालकांनी ही आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की या पूर्वी कधीही सहा दिवस दुरुस्तीसाठी पंप बंद राहिलेले नाही ही पहिलीच वेळ आहे की सहा दिवसासाठी सीएनजी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नक्कीच आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. कारण आम्ही दररोज गॅस भरतो रिक्षाला गॅसची टाकी चार किंवा पाच किलोची असते ती एका दिवसात संपून जाते दुसऱ्या दिवशी आम्हाला परत गॅस भरावा लागतो आणि सीएनजी गॅस वरच रिक्षावाल्यांचा सर्व व्यवसाय अवलंबून आहे, सहा दिवस आम्हाला उपासमारीची वेळ येणार आहे ,अशी प्रतिक्रिया काही रिक्षावाल्यांनी दिली. त्यासाठी सरकारने व सी एन जी कंपनी मॅनेजमेंट ने काहीतरी पर्यायी योजना तयार करून गॅस वाहिनी चे काम करायचे होते.
एक तर पेट्रोलचे दर महाग व एवरेज कमी असल्यामुळे पेट्रोल वर रिक्षा प्रवास चालकाला आणि प्रवाश्यालाही परवडणार नाही,म्हणून अनेक गरजू व गरीब प्रवाशांचे हाल होणार आहेत. आणि रिक्षा मध्ये सीएनजी गॅस नसल्यामुळे रिक्षाही बंद ठेवल्या शिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे रिक्षावाल्यांना ही उपासमारी ची वेळ आलेली आहे याला जबाबदार कोण ? असाही प्रश्न काही रिक्षावाल्याने उपस्थित केला. दुचाकी टॅक्सी वाहतुकीमुळे रिक्षा व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे दुचाकी टॅक्सी वाहतूक हे कायद्याने दुरुस्त नाही तरीही प्रशासन त्यांच्यावर पूर्णतः बंदी आणत नाही आणि त्यात भर सहा दिवस CNG बंद राहणार रिक्षावाल्यांनी जगायचे कसे एवढे अन्याय सहन करून रिक्षावाला आपला उदरनिर्वाह करत आहे. सरकारने रिक्षावाल्याला न्याय द्यावा व दुचाकी टॅक्सी वाहतुकीला कायमस्वरूपी बंदी आणावी अशी अपेक्षा रिक्षावाल्यांनी व्यक्त केली आहे.