नगरसेवक तुषार कामठे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी .
प्रेस मीडिया वृत्तसेवा : पठाण एम एस :
पिंपरी चिंचवड दि.२ पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते गटर सफाईची निविदा प्रक्रिया राबवली आहे.
या बाबत नगरसेवक कामठे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन दिले आहे. यात त्यांनी म्हंटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते गटर सफाईची निविदा प्रक्रिया राबवली आहे. अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सफाई कामासाठी सिक्युर आय टी फैसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि.या कंपनीने निविदा भरली होती.
संबंधित कंपनीने इंदापूर नगरपरिषदेत काम केल्याचा खोटा कार्यादेश आणि प्रामाणपत्र सादर केल्याची बाब इंद्रापूर नगरपरिषद प्रशासनाने मान्य केली आहे. तसा लेखी खुलासाही कळवला आहे. यासह अन्य पुराव्यांची शहानिशा करुन संबंधित कंपनीचे संचालक आणि जबाबदार व्यक्तींवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्फत संबंधित कंपनी आणि अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.