बुली ऍप प्रकरणाची मास्टरमाईंड एक महिला असल्याचे निष्पन्न झाले

 अकाऊंट सांभाळणाऱ्या बंगळुरू मधील सहकाऱ्यालाही अटक.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

मुंबई - मुस्लीम महिलांची छायाचित्रांमध्ये बदल करून त्यांचा लिलावाची जाहिरात देत त्याच्या सोबत आश्‍लाघ्य मजकूर ऍपवर डाऊनलोड करूून समाजद्वारे प्रकाशित करणाऱ्या बुली ऍप प्रकरणाची मास्टरमाईंड एक महिला असल्याचे निष्पन्न झाले आहे.मुंबई पोलिसांनी तिला उत्तराखंडमधून अटक केली असून तिचे हे अकाऊंट सांभाळणाऱ्या बंगळुरूमधील सहकाऱ्यालाही अटक केली असून त्याला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ही छायाचित्रे अपलोड करण्यासाठी ट्‌विटर अकाऊंटच्या आयपी ऍड्रेसच्या आधारे या अभियांत्रीकीचा विद्यार्थी असणाऱ्या तरूणाची ओळख पटवण्यात आली. हे ऍप विकसित करण्यात कोणाचा सहभाग आहे. त्याच स्वत:चा सहभाग होता का? या टोळीच्या अनेक सदस्यांपैकी एक तो आहे..? याची चौकशी त्याच्याकडे करणार येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एका महिलेने या ऍपवर तिची बदनामी केल्याची फिर्याद दिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील सायबर शाखेने अज्ञात व्यक्तींवर गुन्हा शनिवारी नोंदवला. हे ऍप अमेरिकास्थित गिटहबने होस्ट केले आहे. त्यात बदल केलेल्या छअयाछित्रांसह 100 मुस्लीम महिलांबाबात आश्‍लाघ्य माहिती अपलोड करण्यात आली आहे. हे ऍप तयार केल्यानंतर ट्‌विटरने ते दुसऱ्याच दिवशी डिऍक्‍टिव्हेट केले. आणि हे ऍप्लिकेशन काढून टाकले. या प्रकरणात दिल्ली पोलिसांकडे एका महिला पत्रकाराने तक्रार दाखल केली आहे.

या महिलेकडे उत्तराखंडमध्ये चौकशी सुरू असल्याचे सांगून या प्रकरणात तिच मुख्य आरोपी असल्याचे सांगितले. तिला तेथील न्यादंडाधिकाऱ्यांपुढे प्रवासी कोठडी देण्यासाठी हजर करण्यात आले आहे. बंगळुरूतील अटक केलेला अभियांत्रिकीचा विद्यार्थी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव विशाल कुमार असे आहे. दोन्ही आरोपींचा समाजमाध्यमांद्वारा परिचय होता, असे तपासांत आढळून आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post