प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई - मंत्र्यांच्या बंगल्याला गडकोट किल्ल्यांची नावे देणे गैर नाही पण, मात्र गड किल्ल्याच्या नावाला साजेशी वागणूक तिथे असायला हवी. असं म्हणत खासदार संभाजी छत्रपती यांनी यांनी राज्यातील महाविकस आघाडी सरकारच्या मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्याची नावे बदलण्याचा निर्णयाबद्दल मत व्यक्त केलं आहे.ते म्हणाले,'मंत्र्याच्या बंगल्याला गड किल्ल्याचे नाव देण्यात गैर काही नाही पण किल्ल्याच्या नावाला साजेशी वागणूक तिथे असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.'
दरम्यान,महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्याची नावे देण्याचा निर्णय झाला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या शासकीय बंगल्याला रायगड असे नाव देण्यात आले आहे. तर जितेंद्र आव्हाड यांचा बंगला शिवगड तर अमित देशमुख यांचा बंगला आता जंजिरा या नावाने ओळखला जाईल.
कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्याला कोणतं नाव..?
अ 3 - शिवगड - जितेंद्र आव्हाड
अ 4 - राजगड - दादा भुसे
अ 5 - प्रतापगड -के.सी. पाडवी
अ 6 - रायगड - आदित्य ठाकरे
अ 9 - लोहगड -
बी 1 - सिंहगड - विजय वड्डेटीवार
बी 2 - रत्नसिंधू - उदय सामंत
बी 3 - जंजिरा - अमित देशमुख
बी 4 - पावनगड - वर्षा गायकवाड
बी 5 - विजयदुर्ग - हसन मुश्रीफ
बी 6 - सिद्धगड - यशोमती ठाकूर
बी 7 - पन्हाळगड - सुनील केदार
क 1 - सुवर्णगड - गुलाबराव पाटील
क 2 - ब्रह्मगिरी - संदीपान भुमरे
क 3 - पुरंदर
क 4 - शिवालय
क 5 - अजिंक्यतारा - अनिल परब
क 6 - प्रचितगड - बाळासाहेब पाटील
क 7 - जयगड
क 8 - विशाळगड