बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश , तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या
प्रेस मीडिया ऑनलाइन :
मुंबई - मुंबई पोलिसांनी आज सर्वात मोठी कारवाई केली आहे. बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.शहरातील दहिसर भागात मुंबई क्राईम ब्रांचने ही कारवाई केली असून एका आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईचा पर्दाफाश झाल्यानंतर जोरदार खळबळ उडाली आहे.
मुंबई क्राईम ब्रांचला दहिसर मध्ये चार जण बनावट नोटा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती . त्यानंतर पोलिसांनी या चार व्यक्तींवर पाळत ठेवली व त्यांच्या गाडीची झडती घेतली त्यावेळी पोलिसांना या गाडीमध्ये 2000 रुपयांच्या बनावट नोटांचे 250 बंडल मिळाले. 2000 रुपयांच्या एकूण 25 हजार नोटा असे एकूण पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.