काही घटस्फोट हे टोकाच्या वादानंतर आणि भरभक्कम पोटगी मिळाल्यानंतरच झाले आहेत
प्रेस मीडिया :
प्रसिद्ध अभिनेता धनुष आणि ऐश्वर्याने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कलाकारांची प्रेमप्रकरण, विवाह आणि घटस्फोट या नेहेमीच चर्चेतील बाबी राहिल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये कलाकारांच्या घटस्फोटाच्या बऱ्याच बातम्या पाहायला,वाचायला मिळाल्या आहेत.यातील काही घटस्फोट हे टोकाच्या वादानंतर आणि भरभक्कम पोटगी मिळाल्यानंतरच झाले आहेत. कोण आहेत हे कलाकार ते जाणून घेऊया.
1986 साली आमिर खानने घरच्यांच्या विरोधात जाऊन रीना दत्ताशी लग्न केलं. मात्र सोळा वर्षाच्या संसारानंतर 2002मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आमिर खानने घटस्फोट देत असताना रिनाला पोटगीपायी 50 कोटी रुपये दिले होते.
आपल्यापेक्षा 13 वर्ष मोठी असलेल्या अमृता सिंहसोबत सैफ अली खानने 1991मध्ये लग्न केले होते. 2004मध्ये हे जोडपं विभक्त झालं. यावेळी एका मुलाखतीत सैफने सांगितले होते की, अमृताला त्याने 5 कोटी रुपये पोटगी दिली होती. शिवाय मुलांच्या पालन-पोषणासाठी महिन्याला तो एक लाख रुपये देत होता.
हृतिक रोशन आणि सुझान खान हे बॉलीवूडमधील क्युटेस्ट कपल म्हणून ओळखलं जायतं. मात्र या जोडप्यानेही काही कारणाने घटस्फोट घेतला. या घटस्फोटामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. बॉलीवूडमधील महागड्या घटस्फोटांपैकी हा घटस्फोट असल्याचे बोलले जाते. सुझानने पोटगीपायी हृतिककडे 400 कोटींची मागणी केली होती, मात्र 380 कोटींच्या पोटगीवर दोघांत तडजोड झाली होती असं सांगण्यात येतं.
तब्बल सोळा वर्षांच्या संसारानंतर फरहान आणि अधुना यांचे नाते तुटले. त्यावेळी अधुनाने पोटगीच्या रुपात फरहानकडे मुंबईतील 1000 स्क्वेअर फुटाचा बंगला मागितला होता. त्याचबरोबर फरहान आपल्या मुलीच्या पालनपोषणासाठी अधुनाला दर महिना एक मोठी रक्कम देत असतो
आदित्य चोप्राचा घटस्फोटही चर्चेत विषय ठरला होता. राणी मुखर्जीशी लग्न करण्यासाठी आदित्यने आपली पत्नी पायलशी घटस्फोट घेतला होता. त्यावेळी तिला 50 कोटी रुपयांची पोटगी दिली होती.