आता सार्वजनिक ठिकाणी उघडय़ावर थुंकणाऱयांवर कारवाई



प्रेस मीडिया ऑनलाइन :

सुनिल पाटील :

 मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असली तरी कोरोनाला पूर्णपणे हरवण्यासाठी कोरोना खबरदारीचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईत विनामास्क फिरणाऱयांवर कारवाईसाठी एक हजार क्लिनअप मार्शलची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.प्रत्येक वॉर्डात 30 ते 60 क्लिनअप मार्शलची नेमणूक करून कारवाई केली जाणार आहे. या मध्ये सार्वजनिक ठिकाणी उघडय़ावर थुंकणाऱयांवरही कारवाई केली जाणार आहे.


मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर बचावासाठी मास्क वापरणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे आरोग्य तज्ञांकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई सुरू करण्यात आली. यामध्ये पालिकेच्या क्लिनअप मार्शलवर याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली.

ही कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी पोलिसांनाही विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले. रेल्वेतही ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, तिसरी लाट आटोक्यात आली असली तरी सद्यस्थितीत असणाऱया 750 मार्शलची संख्या कायम ठेवून विभागानुसार कारवाईसाठी आणखी मार्शल वाढवण्यात येणार आहेत. दरम्यान, विनामास्क फिरणाऱयांकडून आणि उघडय़ावर थुंकणाऱयांकडून 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे.

कोरोना काळात 87 कोटी 11 लाखांचा दंड वसूल
कोरोना काळात विनामास्क फिरणाऱया 43 लाख 81 हजार 562 जणांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत तब्बल 87 कोटी 11 लाख 81 हजार 475 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

यामध्ये पालिकेच्या माध्यमातून 34 लाख 97 हजार 149 जणांवर कारवाई करण्यात आली असून 69 कोटी 42 लाख 98 हजार 875 रुपयांचा वसूल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांकडून 8 लाख 60 हजार 522 जणांवर करण्यात आलेल्या कारवाईत 17 कोटी 21 लाख 4 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर रेल्वेत 23891 जणांवर कारवाई करण्यात आली असून 47 लाख 78 हजार 200 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post