भाजपच्या अमोल गवळींचा ३९९५ मतांनी पराभव.
प्रेस मीडिया :
मिरज प्रतिनिधी : धनंजय हलकर (शिंदे)
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या प्रभाग सोळा-अ मधून कॉंग्रेस आघाडीच्या तौफिक हारुण शिकलगार यांनी भाजपच्या अमोल गवळी यांचा तब्बल ३ हजार ९९५ मतांनी पराभव केला. शिकलगार यांना ७ हजार ४२९ तर गवळी यांना केवळ ३ हजार ४३४ मते मिळाली. मोठा गाजावाजा करून मैदानात उतरेलल्या भाजपला या पराभवाने मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान विजयानंतर शिकलगार यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष साजरा केला. सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरवात झाली. एकूण चार फेऱ्यामध्ये मतमोजणी झाली. काँग्रेस आघाडीचे तौफिक शिकलगार यांना ७ हजार ४२९, भाजपचे अमोल गवळी यांना ३ हजार ४३४ शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांना ५३५. अपक्ष सुरेश सावंत ५८७ वंचीत आघाडीचे उमरफारुक ककमरीरी २१ व समीर सय्यद यांना १८ मते मिळाली.