क्राईम न्यूज : देहूरोड : ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन फोडताना रंगेहाथ एका तरुणाला अटक

 देहूरोड पोलिसांची धडाकेबाज कामगिरीने नागरिकांकडून कौतुक..


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

मावळ प्रतिनिधी : पठाण एम एस :

देहूरोड बाजार पेठेत पारशी चाळ अबुसेठ रोड वर असलेल्या ॲक्सिस बँकेचे एटीएम पहाटे अंधाराचा फायदा घेऊन फोडताना पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास करण्यात आलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड बाजार येथे ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. आरोपी अनिकेत याने एटीएम मशीन मधील पैशांची चोरी करण्याच्या उद्देशाने एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरे यांचे नुकसान केले. त्या नंतर स्क्रू ड्रायव्हर व हातोडीच्या साह्याने एटीएम मशीनच्या समोरील पत्र्याचा दरवाजा तोडून उच्कटला. त्यानंतर आतील बटनांचे नुकसान केले. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली.


अनिकेत पोपट चव्हाण वय २२ रा. पारशीचाळ, देहूरोड असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिस शिपाई निलेश यादव , पोलिस शिपाई सोपान वालेकर यांनी तत्परता दाखवत या तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई सोपान वालेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.




जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :

मावळ प्रतिनिधी : पठाण एम एस : 94232 49331

Post a Comment

Previous Post Next Post