पोलिस विभागात खळबळ , कारवाईमुळे घडली जन्माची अद्दल .
प्रेस मीडिया ऑनलाइन :
सुनील पाटील :
उत्तर प्रदेशातील समभल मध्ये ताई नाथ असलेल्या महिला इंस्पेक्टरचा एक फोटो व्हायरल होत असून त्यामुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे
वास्तविक, व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये महिला इन्स्पेक्टर ड्युटी दरम्यान एका व्यक्तीकडून पाय दाबून घेताना दिसत आहे. हा व्हायरल फोटो एसपींच्या निदर्शनास येताच महिला इन्स्पेक्टरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. या सोबतच एसपी चक्रेश मिश्रा यांनी पिंक चौकीच्या प्रभारी पदी या महिला इन्स्पेक्टरची 2 दिवसांपूर्वी दिलेल्या नेमणूक आदेशालाही स्थगिती दिली आहे. त्यामुळे या महिला पोलीस अधिकाऱ्याला या कारवाईमुळे जन्माची अद्दल घडली आहे.
संभलच्या सदर पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या महिला निरीक्षक शबनमचा एक फोटो गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. फोटोमध्ये इन्स्पेक्टर शबनम पोलीस ठाण्यात आपल्या खुर्चीवर आराम करत फोनवर बोलत असल्याचे दिसले. तसेच समोर खुर्चीवर बसलेला एक व्यक्ती तिचे पाय दाबताना दिसत आहे. हा फोटो गेल्या बुधवारचा आहे. दरम्यान अनेक तक्रारदारांनी तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले, मात्र महिला निरीक्षकाने कोणाचीही तक्रार ऐकून घेतली नाही, असेही सांगण्यात येत आहे.
महिला निरीक्षकाने खुलासा केला
व्हायरल झालेल्या फोटो प्रकरणी महिला पोलिसाने स्पष्टीकरण देताना आपल्या मानेत दुखत असल्याने समोर बसलेल्या व्यक्तीकडून ॲक्युप्रेशर पद्धतीने उपचार करून घेत असल्याचे म्हटले आहे.
पिंक चौकीला प्रभारी बनवायचे होते, या आदेशाला स्थगिती देण्यात आली . महिला पोलीस अधिकाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर जिल्ह्याचे एसपी चक्रेश मिश्रा यांनी महिला निरीक्षक शबनम यांना धारेवर धरले आहे. एसपी चक्रेश मिश्रा यांनी दोन दिवसांपूर्वी शबनमला पिंक चौकीची प्रभारी बनवण्याचे आदेश दिले होते, मात्र आता त्या आदेशाला रोख लावण्यात आला आहे.