फेरीवाले आत्त्मनिर्भर होणे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर अवलंबून...

 फेरीवाले  हवालदिल: तत्काळ कर्ज मंजूर करा: समाजमन संस्थेची मागणी



प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर, दिनांक. ३: पंतप्रधान आत्त्मनिर्भर योजना ही कोरोना काळात उपयुक्त ठरली होती. या योजनेचा चांगला लाभ पहिल्या टप्यात अनेकांनी घेतला. मात्र, काहीना बँकेच्या पायऱ्या वारंवार झिजवाव्या लागल्या. तसाच अनुभव पुन्हा फेरीवाला यांना येऊ लागला आहे.  पहिल्या टप्प्यात ज्यांनी घेतलेले कर्ज चुकवले आहे. त्यांना दुसऱ्या टप्यात २० हजार चे कर्ज मिळू शकते. यासाठी अनेक फेरीवाले यांनी अर्ज केले आहेत. अनेकांना ते या कर्जासाठी पात्र असल्याचे बँकेकडून अधिकृत संदेश आले आहेत. आणि या संदेशामध्ये जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधण्याची सूचना देखील केली आहे. मात्र, संबंधित बँकेत विविध कारणे सांगून फेरीवाले यांना ताटकळत ठेवले जात आहे. उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया लक्ष्मीपुरी शाखेमध्ये याचा अनुभव येत आहे. या बँकेकडे अनेक फेरीवाले यांनी कर्जासाठी अर्ज केले आहेत. ते पात्र ही ठरले आहेत. मात्र गेल्या जवळपास एक महिन्यापासून बँकमधील अधिकारी ट्टोलवा ट्टोलवी करत आहेत. या बाबतच्या काही तक्रारी समाजमन संस्था कडे आल्या आहेत. मागील महिन्यात बँक ऑफ इंडिया शाखेत या कर्जबदल काहींनी विचारपूस केली आणि आवश्यक कागद पत्रे ही जमा केली आहेत. त्यांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांची बोळवण केली जात आहे. मागील महिन्यात या योजनेचे अधिकारी काही दिवस रजेवर होते. त्यानंतर बँकेचा संप आला. त्यात काही दिवस निघून गेले. आता पुन्हा कर्जदार चौकशी करण्यास गेले त्यावेळी सबंधित योजनेचे अधिकारी ८ दिवस रजेवर आहेत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा फेरीवाले गोंधळात सापडले आहेत. दुसरीकडे कोरोना रुग्ण वाढत आहेत. काही निर्बंध लागू झाली आहेत. अशा काळात उद्योग धंदा याच्यावर पुन्हा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा काळात हातावरील पोट असणाऱ्या फेरीवाले यांना जे पात्र आहेत, त्यांना तरी हे कर्ज तत्काळ मंजूर होणे गरजेचे आहे. याशिवाय जे या कर्जाला अपात्र आहेत. आशा वर्गाचाही विचार होणे आवश्यक आहे. कारण कोरोनामुळे अनेक जणांना त्याचे हफ्ते वेळेवर फेडता आलेले नाहीत. सरकार ने या आर्थिक मागास वर्गातील लोकांकडे सहानभूतीपूर्वक बघावे. ही अपेक्षा आहे, अशी मागणी संस्था अध्यक्ष महेश गंगाराम गावडे यांनी केली आहे. तसेच याबाबत काहीच्या काही तक्रारी असतील त्यांनी खालील मोबाईल वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

संपर्क साधावा;

महेश गावडे -९८२३७६७८५८

....

बाळासाहेब उबाळे

९३२५४०३२१३

...

समाजमनच्या मागण्या

१) योजनेचे अधिकारी रजेवर असतील तर त्यांच्या बदली अन्य अधिकारी नियुक्त करून प्रकरणे मार्गी लावावेत.

२) पात्र लाभार्थी यांना त्वरित कर्ज मंजूर होऊन त्याचा लाभ मिळावा.

३) जे कर्जदार या योजनेसाठी अपात्र ठरतील त्याच्या परिस्थितीचा आणि कोरोना काळात त्यांच्यावर आलेल्या संकट याचा विचार करून अशा घटकालही योजनेचा लाभ देण्याचा विचार करावा.

४)सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक यांनी आर्थिक मागास वर्गातील कर्जदार यांच्या मागे कर्ज हफ्ता भरण्यासाठी तगादा लाऊ नये.कोरोना मुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. काहीच उद्योग बंद पडले आहेत. तरी ही अशा वर्गाकडून अजूनही कर्ज हफ्ता भरण्यासाठी काही बँका दबाव आणत आहेत, असे समाजमनाच्या निदर्शनास आले आहे. 

५) सिबील रिपोर्ट पाहून कर्ज मंजूर केले जाते. ज्यांचे रोजगार गेले, किंवा उद्योग बंद पडले, त्यांनी या पूर्वी कर्ज काडले आहे, त्यांना ठरलेला हफ्ता देणं शक्य होत नाही. त्यांना जास्त मुदतीचे व कमी हफ्तयाचे कर्ज मंजूर होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. 

सद्य परिस्थिती चां विचार करून आर्थिक मागास वर्गातील नोकरदार, छोटे उद्योजक, फेरीवाले यांना कर्ज मंजूर करावे.

Post a Comment

Previous Post Next Post