प्रेस मीडिया वृत्तसेवा:
मुरलीधर कांबळे :
आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पतसंस्थेचे कर्मचारी सकाळी बँकेत आले असता, त्यांना मागील बाजूस खिडकीचे लोखंडी गज तुटल्याचे दिसल्यावर हा प्रकार समोर आला.
कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिल्यावर पोलीस हवालदार मुन्ना कुडची व पोलीस नाईक सुहास पाटील घटनास्थळी पोहचले. यावेळी बँकेच्या अधिका-यांनी तिजोरीची पडताळणी केली असता, चोरट्यांनी रोकड लंपास केल्याचे दिसून आले आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून, चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पतसंस्थेत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम लक्ष्मीपुरी पोलीस करत आहेत.