प्रेस मीडिया ऑनलाइन :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : आलिशान मोटारीच्या नंबर प्लेट, चेस नंबर मध्ये खाडाखोड करून त्याची विक्री करणाऱ्या परराज्यातील टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. या प्रकरणी कर्नाटकातील तिघांना अटक करण्यात आले.त्यांच्याकडून पाच कोटी रुपये किमतीच्या ३१ आलिशान मोटारी पोलिसांनी जप्त केल्या.
हे रॅकेट महाराष्ट्र-कर्नाटक, मणिपूरसह इतर राज्यात सक्रिय असल्याची माहिती पुढे येत आहे. जहीर अब्बास अब्दुल करीम दुकानदार (४२), यश प्रशांत देसाई (२६) आणि खलिद अहमद लियाकत सारवान (४०, सर्व कर्नाटक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.