शिरोळ मधून राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी..
प्रेस मीडिया ऑनलाइन :
कोल्हापूर जिल्हा बॅंक निवडणुकीत शिरोळ मधून मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी झाले आहेत. ‘दत्त’चे चेअरमन गणपतराव पाटील यांना ५१ मते, तर यड्रावकर यांनी ९८ मते मिळाली आहे.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर सर्वांना निकालाची उत्सुकता लागली होती. उमेदवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते आकडेमोड सुरू करून किती मते पडतील, याचा अंदाज घेत होते. मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व ‘दत्त’चे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या निकालाकडे नजरा लागल्या होत्या.
गणपतराव पाटील यांच्या पाठीशी शिरोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेते असल्याने जिल्हा बँकेवर कोणाची वर्णी लागणार यावर जिल्हासह राज्याचे याकडे लक्ष लागून राहिले होते. पण अखेर निवडणुकीत राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बाजी मारली आहे.गुरुवारी रात्री जिल्हा बँकेचे उमेदवार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या विजयाचे फलक जयसिंगपूर शहरात लावण्यात आले. सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन दत्त कारखान्याचे चेअमरन गणपतराव पाटील यांना रिंगणात उभे केल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष शिरोळच्या घडामोडींकडे लागले होते.
प्रकाश आवाडे पराभूत.. अर्जुन आबिटकर विजयी...
कोल्हापूर जिल्हा बँक निकाल..
कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे पराभूत झाले. भुदरगड-राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर विजयी झाले आहेत.कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे पराभूत झाले. भुदरगड-राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर विजयी झाले आहेत.
कोल्हापूर जिल्हा बँकेवर सत्ताधारी गटाने वर्चस्व राखले आहे. याआधी ६ जागा बिनविरोध आणि आता मतदानानंतर त्यांच्या ६ जागा निवडून आल्या आहेत.
राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीकडून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर व खा. संजय मंडलिक रिंगणात होते. आसुर्लेकर यांना आ. विनय कोरे यांनी थेट विरोध होता. त्यामुळे ईर्ष्या अधिक टोकाला गेली. आसुर्लेकर यांना परिवर्तन पॅनेलमधून उमेदवारी देत सत्ताधार्यांना आव्हान दिले. आसुर्लेकर व मंडलिक यांनी या गटातून बाजी मारली आहे.