तर उपाध्यक्षपदी आमदार राजीव आवळे...
प्रेस मीडिया :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा बँकेवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पॅनेलनं विजय मिळवला आहे.त्यांच्यापुढं शिवसेनेच्या वतीनं निवडणुकीत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शिवसेनेला यश मिळालं नाही. आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ याचं नाव निश्चित करण्यात आलं तर उपाध्यक्षपदासाठी आमदार राजीव आवळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
जिल्हा बँकेचं अध्यक्षपद अपेक्षे प्रमाणं हसन मुश्रीफ यांच्या कडे
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचं नाव अंतिम करण्यात आलं आहे. हसन मुश्रीफ आणि पी.एन.पाटील यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. अखेर हसन मुश्रीफ नाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदासाठी आमदार राजीव आवळे यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष नाव निश्चितीसाठी सत्तारूढ गटाच्या नेत्यांची बैठक सर्किट हाऊस इथं झाली.
कोल्हापूर जिल्हा बँक राजकीय चित्र
कोल्हापूर जिल्हा बँकेतील सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीनं निवडणूक झालेल्या 15 जागांपैकी 11 जागा मिळवल्या होत्या. राजेंद्र पाटील-यड्रावकर,राजू आवळे,विनय कोरे,सुधीर देसाई,संतोष पाटील,रणजितसिंह पाटील,भैया माने,स्मिता गवळी,निवेदिता माने,श्रुतिका काटकर,विजयसिंह माने हे विजयी झाले आहेत. तर, बिनविरोध विजयी झालेल्या पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन.पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक आणि ए. वाय. पाटील यांच्या जागा आणि निवडणुकीतील 11 जागा अशा एकूण 17 जागांसह हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी बँकेवर वर्चस्व मिळवलं होतं. तर विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला तीन जागा मिळाल्या तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.