मागील वर्षी प्रथम आलेल्या विद्यार्थ्याच्या हस्ते झाले ध्वजारोहण..
नरेश कोळंबे : कर्जत
ज्ञानकमल शिक्षण संस्था संचलित हुतात्मा हिराजी पाटील ज्यु.काॅलेज कडाव आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळा व वार्षिक क्रिडामहोत्सव गुणगौरव समारंभाच्या वेळी इ.१२ वी च्या वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अनिकेत बार्शी या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. त्यामुळे या अनोख्या कृतीमुळे सर्वच स्तरांतून प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे.
ध्वजारोहण नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवर कर्जत न.प.नगरसेविका स्वामीनी मांजरे , यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्याशी संवाद साधून मुलीनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले हक्क व कर्तव्य याबाबत जागरूक राहणे बाबतीत आवाहन केले. कुस्तीगीर संघटना अध्यक्ष भगवान धुळे यांनी यापुढील खेळाच्या उपक्रमांसाठी सन्मानचिन्ह व साहीत्य उपलब्ध करून देणेबाबत आश्वासन दिले . संस्थेच्या अध्यक्ष तथा प्राचार्य प्रा.मनिषा बैकर मॅडम यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत तसेच कनिष्ट महाविद्यालय विद्यार्थ्यासाठी राबवित असलेल्या उपक्रमाबाबत संक्षिप्त आढावा घेतला. संस्थेचे सचिव नामदेव बैकर सर यांनी देशातील बदलत्या परिस्थितीत विद्यार्थी व शिक्षकवृंदास नवनवीन आव्हाने व बदल स्वीकारून परिस्थितीत बदल घडविण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंदु महासभा अध्यक्ष, , मथुरा शहर ऋषी कुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून अनेक प्रेरक गोष्टी सांगीतल्या.जिवनामध्ये काहीतरी विशेष करून दाखविले तरच समाज नक्कीच आपल्याला ध्यानात ठेवेल. तसेच समाजासाठी राष्ट्रासाठी काहीतरी योगदान देणेबाबत आव्हान केले. कार्यक्रमासाठी शे का प महिला आघाडीच्या कोयल कणेरीकर चैतन्य कणेरीकर, ऋषी कुमार शर्मा , नगरसेविका स्वामीनी मांजरे , मनिषा बैकर,नामदेव बैकर , वसंत जाधव तसेच विद्यार्थ्यांचे पालक, सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते .यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध खेळामध्ये तसेच विविध कला प्रदर्शनामध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्याचा विशेष सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा.पुर्णिमा जाधव मॅडम यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा.राधीका राणे मॅडम यांनी केले.