स्त्रियांच्या पाय पिटेला विराम ..
प्रेस मीडिया ऑनलाइन:
कर्जत - नरेश कोळंबे :
कर्जत तालुक्यातील बार्डी ह्या गावातील स्त्रियांना आपले राशन आणण्यासाठी १ किलोमीटर अंतरावर असलेल्या रास्त भाव धान्य दुकान चिंचवली येथे जावे लागत होते. ह्या गावातील महिलांचा विचार करत आज बार्डी ह्या गावी वेगळे रास्तभाव धान्य दुकानाचे उदघाटन करण्यात आले आणि स्त्रियांना होणाऱ्या पाय पिटीच्या त्रासाला पूर्णविराम देण्यात आल्याने गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
बार्डी हे गाव भिवपुरी स्थानक नजिक असून ह्या गावातील स्त्रियांना आपले महिन्याचे स्वस्त धान्य आणण्यासाठी १ किलोमीटर अंतर चालत जाऊन डोक्यावर ते ओझे आणावे लागत होते. ह्या स्त्रियांना होणारा त्रास लक्षात घेता गावातील सावित्रीबाई फुले स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून बार्डी ह्या गावातच नवीन रास्त भाव धान्य दुकान चालू करण्यात आले आणि त्याचे उद्घाटन २६ जानेवारी ह्या प्रजासत्ताक दिनी चिंचवलीच्या सरपंच सुनीता मंगेश अहिर ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्यावेळी महिला बचत गट प्रमुख सविता सुरेश कांबरी, ह. भ. प .मधुकर कराळे,श्री. मनोहर कांबरी, श्री तुकाराम भगत, श्री. सूर्याजी कडव,माजी उपसरपंच दिपाली कांबरी , माजी सदस्य उमेश कांबरी , माजी सदस्य भालचंद्र कांबरी , नामदेव शेळके, सदाशिव कांबरी , हरेश्वर कांबरी,प्रकाश कोळंबे, सुनिल थेर, माजी तंटा मुक्ती अध्यक्ष भरत कांबरी , नरेश कांबरी व सचिव हिरा महेंद्र दळवी,आणि बचत गटातील सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या प्रसंगी ह. भ. प .मधुकर कराळे, मनोहर कांबरी, तुकाराम भगत, सूर्याजी कडव यांनी बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले तसेच
प्रा. योगेश कांबरी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.