प्रेस मीडिया ऑनलाइन :
कर्जत तालुका प्रतिनिधी : नरेश कोळंबे
पोद्दार समृद्धी कॉम्प्लेक्स या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती. ह्या रस्त्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न देखील केले होते परंतु त्यास सफलता आली नव्हती. उमरोली ग्राम पंचायत सदस्य तथा शिवकामगार सेना विभाग प्रमुख अजय अशोक घारे यांनी ह्या रस्त्यासाठी कर्जत खालापूर चे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे ह्या संबंधी पाठपुरावा केला होता. त्यांचं फलित म्हणून आज ह्या रस्त्यासाठी आमदार निधीतून निधी देत कार्यसम्राट आमदार महेन्द्र थोरवे यांनी भूमिपूजन केले .
पावसाळयात खडी निघून अत्यंत खराब झालेल्या पोद्दार समृद्धी कॉम्प्लेक्स या रस्त्यावरून चालणे अथवा वाहन चालविणे अत्यंत जीकरीचे झाले होते. त्यामुळे पोद्दार समृद्धी कॉम्प्लेक्स येथे राहणारे सर्व ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी आग्रही भूमिका मांडली होती. याच गोष्टीला दुजोरा देत उमरोली ग्राम पंचायत सदस्य तथा शिवकामगार सेना विभाग प्रमुख अजय अशोक घारे यांनी ह्या रस्त्याची माहिती आमदार महेंद्र थोरवे यांना दिली आणि विना विलंब मा. आमदार महेंद्र थोरवे यांनी या रस्त्यासाठी आमदार निधीतून २० लाखांचा निधी मंजूर करून दिला.
ह्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आज कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी हजेरी लावत सदर रस्त्याचे भूमिपूजन केले. ह्या भूमिपूजन सोहळयासाठी तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, प्रसाद थोरवे, शिवाजी दादा कराळे, उमरोली जिल्हा परिषद विभाग प्रमुख शरद ठाणगे, उमरोली पंचायत समिती विभाग प्रमुख अविनाश भासे, उमरोली ग्रामपंचायत माजी सरपंच विद्यमान सदस्या सौ मोनिका समीर साळुंखे, सदस्य प्रसाद भासे, शिवसैनिक संदीप लोंगले, हेमंत घारे, अरविंद घारे, बापूराव होळमाणे , संजय यादव आदी लोक उपस्थित होते.