विराज ग्रुप आॅफ इंडस्ट्रीज अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते वितरण.
प्रेस मीडिया ऑनलाइन :
इस्लामपूर : इकबाल पीरज़ादे
चिखली (ता. शिराळा) येथे 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त विश्वास उद्योग समूहामार्फत शिराळा, वाळवा व शाहूवाडी तालुक्यातील पत्रकारांचा गौरव समारंभ संपन्न झाला. भाटशिरगाव येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन्स सेवा केंद्रात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अध्यक्ष मा. विराज नाईक होते. प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे होते.
स्वागत व प्रास्तविक तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे यांनी केले. तीनही तालुक्यातील पत्रकार संघटना अध्यक्ष व पत्रकारांचा कोणत्याही प्रकारचा अपघात होऊन मृत्यू झाल्यास एक लाख रुपये अथवा अपघात होऊन त्यावरील उपचारासाठी एक लाख रुपये असा दोन लाख रुपयांचा विमा व पेन भेट देऊन जिल्हाध्यक्ष मा. विराज नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट (बिळाशी), संतोष कुंभार (मलकापूर, शाहूवाडी), संजय पाटील (वाकुर्डे), आबासाहेब पाटील (इस्लामपूर) यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष मा. विराज नाईक यांचे अध्यक्षीय भाषण झाले. महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी पत्रकाराच्या वतीने जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांचा शाल, पुष्पहार व फेटा देऊन सत्कार केला.
या वेळी ग्रामीण आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल धनाजी पाटील (इटकरे, वाळवा), प्रकाश सादळे (ढगेवाडी, ता. वाळवा) यांचा, तर ग्रामीण कथाकार, पत्रकार बाबासाहेब परीट यांची नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी निमंत्रित कथाकार म्हणून पश्चिम महाराष्ट्र मधून सहभागी झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. पत्रकार संघटनांचे अध्यक्ष दिनेश हसबनिस, संतोष पाटील, अजय जाधव, भरत गुंडगे, अभिजित जाधव, यांच्यासह आबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. विजय थोरबोले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी संचालक पाटील यांनी आभार मानले. यावेळी शिराळा, वाळवा व शाहूवाडी तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते..