स्नेहसंमेलन व उपक्रमातून विद्यार्थ्यांची जीवनबाग फुलते : कवी गजानन पाटील.

 


प्रेस मीडिया ऑनलाइन :

इस्लामपूर : (प्रतिनिधी) 

स्नेहसंमेलन व विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यातूनच त्यांची जीवन बाग फुलत असते असे प्रतिपादन कवी व अभिनेता गजानन पाटील यांनी केले. ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आंधळी येथील              हिंद केसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी बोलत होते.तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणातून कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव नरेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आई,वडील व गुरुजनांना कधीच विसरु नये कारण ते आपले हितरक्षक असतात असा मौलिक संदेश दिला.यावेळी अपूर्व विज्ञान मेळावा,प्रश्नमंजुषा, रांगोळी प्रदर्शन यांचे उद्घाटन सरपंच अमित चव्हाण, उपसरपंच माणिक माने,बजरंग जाधव, अर्जुन कदम व सचिन शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आले.

तसेच 'अशी पाखरे येती व झेप' या हस्तलिखितांचे प्रकाशनही करण्यात आले.लिखे जो खत तुझे,लल्लाटी भंडार,मराठंमोळ गाण॔, चला जेजुरीला जाऊ अशा अनेक नृत्यांनी तसेच तबलावादन व नाटक अशा विविध कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करुन सोडले.यावेळी मान्यवरांचे हस्ते बौद्धिक व क्रीडा स्पर्धेतील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याना प्रशस्तिपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.क्रीडाशिक्षक मंगेश माने यांना विद्योतेज्जक प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यातआले. कार्यक्रमाचे स्वागत आर.एम.खामकर व प्रास्ताविक मुख्याध्यापक जयवंत मोहिते यांनी केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासो माने,उपाध्यक्ष विष्णु माने,यशवंत माने,निशांत पाटील, विनोद कदम हणमंत जाधव,संतोष कदम,नशीर मुल्ला,फौजी पांडुरंग जाधव, मेजर वसंतराव मोरे,विठ्ठल कदम,माजी सरपंच विलास दादा माने आदी मान्यवर व ग्रामस्थ पालक बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचा परिचय एस.एस.कांबळे व आभार डी.व्ही.बंडगर यांनी मानले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन ए.ए.पाटील, यु.एस.गुरव व एस.पी.पाटील यांनी आणि संयोजन आर.आर गायकवाड      डी.सी.चौधरी,यु.बी.शिंदे,बी.एच.जाधव. पी.डी.बंगाल,एस.डी.कोळेकर आदींनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post