प्रेस मीडिया ऑनलाइन :
इस्लामपूर : इकबाल पीरज़ादे :
ऐतवडे खुर्द तालुका वाळवा येथील श्री वारणा महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या व संवाद शास्त्र विभागाच्यावतीने शनिवार दिनांक ८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता वारणा शिक्षण संकुलात *पत्रकार सन्मान सोहळ्याचे* आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर प्रताप पाटील (काका) यांनी दिली.
गेल्या 21 वर्षांपासून महाविद्यालयाच्या वृत्तविद्या विभागामार्फत सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील वाळवा शिराळा आणि शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्याची परंपरा जोपासली आहे.पत्रकार दिनाचे औचित्य साधून शनिवारी होणाऱ्या या कार्यक्रमात साहित्य प्राज्ञ.स्वर्गीय बाजीराव बाळाजी पाटील( बापुजी) यांच्या नावे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.या समारंभासाठी ज्येष्ठ विचारवंत संजय आवटे, शिवाजी विद्यापीठाच्या विभागप्रमुख डॉक्टर निशा मुंडे -पवार वाळवा विभागीय पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती डॉक्टर पाटील यांनी यावेळी दिली