स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा* *अभियान अंतर्गत

 शहरातील ऐतिहासिक मोठे तळे वजा विहीर परिसरात स्वच्छता मोहीम.


इचलकरंजी : स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानां तर्गत इचलकरंजी नगर परिषदेच्या विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक मोठे तळे वजा विहीर परिसराची स्वच्छता करण्यात आली.  नगरपरिषदेचे अधिकारी तसेच आरोग्य विभागाकडील जवळपास ७५ कर्मचारी , व्यंकोबा तालीम मधील जवळपास ५० पैलवान आणि तेजोनिधी रेस्क्यू फोर्सचे २५ स्वयंसेवकांच्या सहाय्याने आजची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

या परिसरातुन १० टन प्लॅस्टिक कचरा गोळा करणेत आला. त्याचबरोबर आवळे मैदान जवळील आणि जिजामाता मार्केट या दोन ठिकाणचे कचरा कोंडाळे हटवुन सदर  जागा सुशोभित करणेत आल्या.

 आजच्या या मोहिमेत उपमुख्याधिकारी केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे,विद्युत अभियंता संदीप जाधव, लेखापरीक्षक नितिन सरगर, खरेदी. पर्यवेक्षक प्रतापराव पवार, मुख्य स्वच्छता निरिक्षक सुर्यकांत चव्हाण,  संगणक अभियंता संतोष पवार, स्वच्छता निरिक्षक विजय पाटील, संपत चव्हाण, सर्जेराव पाटील, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे आदी उपस्थित होते.


   

Post a Comment

Previous Post Next Post