प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी (तालुका हातकणंगले ) येथे लोक क्रांती विकास आघाडीच्या कार्यालय मध्ये आरोग्य हक्क समितीची मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती यावेळी आरोग्य हक्क समितीचे दत्ता मांजरे तारदाळकर व नागेश क्यादगी यांनी कार्यशाळा आयोजनाचे माहिती दिली. आरोग्य समितीच्या वतीने माननीय श्री शाईन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून या मध्ये रुग्णांच्या हक्काबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून याचा लाभ सर्व लोकांनी घेण्याचे आव्हान केले आहे.
या वेळी दत्ता मांजरे तारदाळकर, नागेश क्यादगी, मच्छिंद्र कांबळे, विद्या सुतार, अंजली आगलावे, सलीम मानगावे, श्रीकांत कांबळे,जगदीश अंगडी, विलास कांबळे (जादूगार), महादेव घट्टे,अमृत घट्टे, शैलेश कांबळे, सुनील मुदगल,दत्तात्रय गोडबोले, अशोक ठोमके, वंदना भंडारे, विजय कांबळे, *योगेश वाडकर, सुशांत कांबळे, दिलीप रेपे, मुकुंद शेंडगे, नेहा मुजावर, दीपक पाटेकर, आदी उपस्थित होते*