प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी :
इचलकरंजी शहरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित आरोपी सनी कोळी याला दोषी ठरवून दहा वर्षांची सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.पिडीत मुलीच्या वतीने सरकारी वकील हेमंत मोहिते - पाटील यांनी काम पाहिले.लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला शिक्षा होवून पिडीत मुलीला न्याय मिळाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
माणगाव येथील सनी कोळी याने इचलकरंजी शहरातील एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते.तसेच तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी संबंधित अत्याचार पिडीत मुलीने सनी कोळी या २७ वर्षीय युवकाच्या विरोधात सहा महिन्यांपूर्वी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनीबलात्काराचा गुन्हा दाखल करुन घेत तात्काळ संशयित आरोपी सनी कोळी याला ताब्यात घेवून अटक केली होती.यानंतर या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा चव्हाण यांनी सुरु ठेवला होता. तसेच या प्रकरणाचे दोषारोप पत्र इचलकरंजी येथील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते.यावर सुनावणी सुरु करण्यात आली होती.
या सुनावणी दरम्यान न्यायालयाकडून दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत तीन साक्षीदार तपासण्यात आले.यामध्ये न्यायाधीश आर.एन.बावनकर यांनी या प्रकरणातील पीडित मुलीची साक्ष ग्राह्य धरुन या प्रकरणातील संशयित आरोपी सनी कोळी याला दोषी ठरवत दहा वर्षाची सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा करण्याचे आदेश दिले.या प्रकरणात पिडीत मुलीच्या वतीनेसरकारी वकील हेमंत मोहिते - पाटील यांनी काम पाहिले.दरम्यान ,लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला शिक्षा होवून पिडीत मुलीला न्याय मिळाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.