प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : प्रतिनिधी :
इचलकरंजी येथे आरोग्य हक्क समितीच्या वतीने येत्या १५ व १६ जानेवारी रोजी शासकीय आरोग्य सुविधांची माहिती मिळावी ,या उद्देशाने आरोग्य हक्काबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा लोकक्रांती आघाडीच्या कार्यालयात होणार असल्याची माहिती दत्ता मांजरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली.
आरोग्य हक्क समितीच्या वतीने सर्वसामान्य जनतेला शासकीय आरोग्य सुविधांची माहिती दिली जाते. तसेच विविध आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केला जातो.याच अनुषंगाने सर्वसामान्य जनतेला आरोग्य योजनेतंर्गत मिळणाऱ्या सुविधांची माहिती मिळावी ,त्यांचे वैद्यकीय मुलभूत हक्क कळावेत यासाठी येत्या १५ व १६ जानेवारी अशी दोन दिवसीय कार्यशाळा इचलकरंजीत लोकक्रांती विकास आघाडीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये शाईन शेख व विविध मान्यवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दत्ता मांजरेकर व नागेश क्यादगी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली.तसेच नागरिकांनी या कार्यशाळेत सहभागी होवून मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन केले.
यावेळी मच्छिंद्र कांबळे ,विद्या सुतार ,अंजली आगलावे ,सलिम माणगांवे ,श्रीकांत कांबळे ,जगदिश अंगडी ,विलास कांबळे ,महादेव घट्टे ,अम्रुत घट्टे ,शैलेश कांबळे ,सुनिल मुदगल ,दत्तात्रय गोडबोले ,अशोक ठोमके ,वंदना भंडारे ,विजय कांबळे ,योगेश वाडकर ,सुशांत कांबळे ,दिलीप रेपे ,मुकुंद शेंडगे ,नेहा मुजावर ,दीपक पाटेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.