प्रेस मीडिया ऑनलाइन :
गरीबीच्या ,हालाखीच्या काळात भोगलेलं दु:ख - वेदनांची जाण कायम मनात ठेवली की आपल्या अपार मेहनतीच्या जोरावर कितीही मोठं यश गाठलं तरी आपले पाय जमिनीवर घट्ट राहतातच...किंबहुना आपल्या वाट्याचे दु:ख - वेदना इतरांच्या वाट्याला येवू नये ,यासाठी आपल्याकडून जितकं काही करता येईल ,तितकं अगदी प्रामाणिकपणे करत राहणं ,इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणणं ,
हाच ज्यांचा जगण्याचा माणुसकीचा धर्म बनतो ,अशा भल्या माणसांमध्ये आमचा बालमित्र व दिलदार मनाचा सर्वांचा लाडका बापू अर्थातच प्रविण कुलकर्णी...आज आमच्या बापूचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी जणू आनंदाच्या उत्सवाचा क्षण...प्रजासत्ताक दिनादिवशीच या भल्या माणसाचा वाढदिवस म्हणजे जणू दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल...यानिमित्ताने त्यानं आजपर्यंत जगलेल्या व जगत असलेल्या सा-या क्षणांचे चित्र डोळ्यासमोर येत राहते...वरकरणी ,अत्यंत साधासुधा वाटणारा बापू अर्थातच प्रविण हा नावाप्रमाणेच अगदी यशाच्या कर्तृत्वाबरोबरच सर्व घडामोडींचा अभ्यास करण्यात ,सामाजिक भान जपण्यात आणि माणुसकी जपत माणूस म्हणून जगण्याच्या धडपडीत देखील अगदी प्रविण ठरला आहे... त्याचं व्यक्तीमत्व म्हणजे साधी राहणी ,उच्च विचारसरणी या शब्दाला पुरेपूर लायक अन् न्याय देणारी आहे... पत्रकारिता क्षेत्रातील माझ्या जडणघडणीत त्याचा खूप मोठा वाटा आहे , हे मी अगदी प्रांजळपणे कबूल करताना मला या माझ्या बालमित्राचा अभिमान तर वाटतोच पण असा मित्र मला भेटला ,यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो...त्यानं आपल्या प्रेमळ व दिलदार स्वभावानं अनेक जीवाभावाची नाती मिळवली आहेत अन् ती जपण्यात देखील तो कुठेच कमी पडत नाही... प्रत्येकाच्या सुख - दु:खात सामील होण्याचा त्याचा प्रयत्न म्हणजे त्याच्यातील ख-या माणूसपणाचं दर्शन घडवणारं आहे...त्यानं अपार मेहनतीच्या जोरावर गाठलेलं कर्तृत्वाचं शिखर हे सर्वांनाच प्रेरणादायी व अनुकरणीय आहे... अगदी सुरुवातीच्या काळात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यानं कुरीयर सेवा पुरवण्याचं काम करतच स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला होता...या त्याच्या प्रामाणिक प्रयत्न व अपार मेहनत करण्याच्या धडपडीमुळंच त्यानं गेल्या दोन तपांच्या काळात दैनिक महासत्ता ,दैनिक पुढारी आणि आता
दैनिक सकाळमध्ये अगदी प्रूफरिडर ( मुद्रितशोधक )
ते उपसंपादक पदापर्यंत मजल गाठून प्रेरणादायी यशाची चुणूक दाखवून दिली आहे...स्वतःला सिध्द करतानाच त्यानं आई -वडिलांची मनोभावे सेवा करण्याचं जपलेलं व्रत मला आजच्या काळातला खरा श्रावणबाळ वाटतो...मुळात ,त्याचा स्वभावच सतत इतरांना मदत करणं ,नाती जीवापाड जपणं असा असल्याने त्याच्या नात्याचा गोतावळा खूप मोठा आहे... यामध्ये वावरताना तो भौतिक सुखाच्या पलिकडचा शाश्वत श्रीमंतीचा धनी असल्याची प्रचिती आणून देतो...आणि यातूनच त्याचे मोठेपण अधोरेखित होते...संस्कृती व आधुनिकता यांचा अचूक मेळ साधत अभ्यासूव्रुतीतून घडलेलं हे उच्चशिक्षित असूनही सुसंस्कृत असलेलं व्यक्तीमत्व म्हणजे आचार ,विचाराबरोबरच सा-याच विधायक कामाच्या बाबतीत प्रविण ठरलं आहे ,असं मी अगदी ठामपणे सांगू शकतो...आजही अडचणीच्या काळात त्याचा अभ्यासू व अनुभवाचा चांगला सल्ला घेण्यासाठी अनेकजण त्याला भेटायला येतात...त्याच्या जीवापाड मैत्री निभावण्याच्या स्वभावाचा अनुभव घेतलेले चार - चौघे नव्हेतर अनेकजण सापडतील...
...अशा प्रेमळ व दिलदार बालमित्र असलेल्या बापूला अर्थातच प्रविणला असेच यशाचे ,सुखाचे ,समाधानाचे अन् उदंड आयुष्याचे क्षण लाभोत ,याच त्याला आजच्या वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा !