इचलकरंजीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन



प्रेस मीडिया ऑनलाइन :

इचलकरंजी / प्रतिनिधी :

महावितरण कार्यालयाकडून वीज बील थकीत असलेल्या शेतक-यांच्या शेतीपंपाचा विद्युत पुरवठा बंद करण्याचा प्रकार घडत आहे. या अन्यायी प्रकाराच्या निषेधार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  इचलकरंजी महावितरण कार्यालयात येवून कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले . तसेच शिष्टमंडळाने त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.


कोरोना महामारी ,लाँकडाऊन आणि वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.त्यात आता महावितरण कार्यालयाकडून थकीत बील असणाऱ्या शेतक-यांच्या शेतीपंपाचा वीज पुरवठा बंद करण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे आधीच समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या शेतकरी वर्गातून महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या अन्यायी प्रकाराच्या निषेधार्थ  आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इचलकरंजी महावितरण कार्यालयात येवून कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले.तसेच शिष्टमंडळाने त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.या मध्ये सरासरी वीज बिलाचे रिवीजन करावे ,मार्चअखेर पर्यंत वीज बील हप्त्यात भरण्यास मुदतवाढ द्यावी ,प्रत्येक शेतकऱ्यांना स्वतंत्र वीज मीटर बसवून द्यावे ,अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता किशोर राठी यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना थकीत वीज बीला संदर्भात शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी स्वाभिमानीचे बसगोंडा बिरादार, अभिषेक पाटील, सतीश मगदूम, पुरंदर पाटील, विश्वास बालीघाटे, अरिहंत कुपवाडे, कुमार जगोजे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post