इचलकरंजीत ग्राहक पंचायत संघटनेतर्फे प्रबोधनपर मार्गदर्शन कार्यक्रम




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे ग्राहक पंचायत शाखेच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जनजागृती सप्ताह अंतर्गत प्रबोधनपर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.गोविंदराव हायस्कूलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमास वैध मापन शास्त्र कोल्हापूर जिल्हा शाखेचे उपनियंत्रक राजेंद्र गायकवाड ,ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी.जे पाटील ,कायदा सल्लागार राजेंद्र वायंगणकर ,जिल्हा संघटक सुरेश माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संघटना ग्राहकांचे मुलभूत हक्क व अधिकार अबाधित रहावेत ,त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून प्रयत्नशील असते.ब-याचदा बाजारपेठेत ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत असतात. अशावेळी फसवणूक झालेल्या संबंधित ग्राहकांना न्याय देण्यासाठी ही संघटना लोकशाहीच्या मार्गाने लढा देत असते.त्यामुळे ग्राहकांना ही संघटना मोठा आधार देणारी ठरली आहे. या संघटनेच्या राज्यभरात सर्वत्र शाखा असून या  माध्यमातून ग्राहकांचे हक्क व अधिकाराचे संरक्षण होण्यासाठी प्रयत्न होत आहेत.या संघटनेच्या इचलकरंजी शाखेच्या वतीने नुकताच राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.यानिमित्त जनजागृती सप्ताह अंतर्गत प्रबोधनपर मार्गदर्शन कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

यावेळी वैध मापन शास्त्र कोल्हापूर जिल्हा शाखेचे उपनियंत्रक राजेंद्र  गायकवाड ,ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी.जे पाटील ,कायदा सल्लागार राजेंद्र वायंगणकर ,जिल्हा संघटक सुरेश माने यांच्यासह मान्यवरांनी ग्राहक म्हणून प्रत्येकाने सजग राहतानाच आपली फसवणूक होत असेल तर वेळीच आवाज उठवून चुकीच्या प्रकारांना आळा घालावा ,असे मौलिक मार्गदर्शन केले.

यावेळी गोविंदराव हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष चिंचवाडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य ,शिक्षक विकास कांबळे यांनीही मनोगतात ग्राहक हित जोपासण्यासंदर्भात मौलिक मार्गदर्शन केले. तत्पूर्वी ,संघटनेचे शहराध्यक्ष सुरेंद्र दास व उपाध्यक्ष अरुण साळुंखे यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र इचलकरंजी शाखेच्या वतीने ग्राहकांच्या हितासाठी प्रबोधन आणि विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमास विद्यार्थी ,शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संघटनेचे आर.बी व्यास ,शाखा प्रसिद्धी विभाग प्रमुख सारंग दास ,

कायदा सल्लागार अक्षय शिरगुप्पे, सदस्य गंगाराम पाटील यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post