हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिरच्या तीन विद्यार्थ्यांचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत

 


प्रेस मीडिया ऑनलाइन :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी : मागील शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इचलकरंजी नगरपालिकेच्या हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिरच्या पाचवीच्या तीन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत चांगले यश संपादन केले.यामध्ये रेहान मुल्ला ,सुषमा चिकले ,राही कांबळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या यशाबद्दल सदर विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


इचलकरंजी शहरातील जुना चंदूर रोड परिसरात असणाऱ्या नगरपालिकेच्या हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिर क्रमांक २८ मध्ये शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्ता शिक्षण देतानाच त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध स्पर्धा व उपक्रम घेतले जातात.याचेच फलित म्हणजे या शाळेचे विद्यार्थी परीक्षेबरोबरच विविध स्पर्धांमध्ये चांगले यश संपादन करत हम भी किसीसे कम नहीं ,हे दाखवून देण्यात कमालीचे यशस्वी ठरले आहेत. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व विविध कौशल्य हे खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांपेक्षा एक पाऊल पुढेच आहे.जुना चंदूर रोड परिसर हा बहुतांश कामगार वर्ग असलेला आहे. त्यामुळे कामगार वर्गाच्या मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे ,यासाठी हुतात्मा बाबू गेन विद्या मंदिर क्रमांक २८ च्या माध्यमातून शिक्षकांबरोबरच नगरसेविका सौ.तेजश्री भोसले ,सामाजिक कार्यकर्ते पै.अम्रुत भोसले ,नगरसेवक रवी लोहार

यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अविरत प्रयत्न सुरु ठेवले आहेत.यामध्ये शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास  आणि विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करुन घेतली जाते.मागील शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इचलकरंजी नगरपालिकेच्या हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिरच्या पाचवीच्या तीन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत चांगले यश संपादन केले.यामध्ये रेहान मुल्ला ,सुषमा चिकले ,राही कांबळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या यशाबद्दल सदर विद्यार्थ्यांचे हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिरचे मुख्याध्यापक नारायण पाटील ,इचलकरंजी शिक्षक संघाचे अध्यक्ष व शिक्षक किरण दिवटे ,पै.अम्रुत भोसले ,नगरसेविका रवी लोहारयांच्यासह शिक्षक व नागरिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक  शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या सदर विद्यार्थ्यांना शिक्षिका सौ.संगीता कोळी ,सौ.कल्पना कुंभार ,सौ.वसुधा गुरव ,शिक्षक किरण दिवटे यांच्यासह मुख्याध्यापक नारायण पाटील व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल सदर विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post