प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी ता. ३० राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी अर्थात हुतात्मा दिनी समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शशांक बावचकर यांच्या हस्ते हा पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ.अनिल अवचट आणि समाजवादी प्रबोधिनीचे स्थापनेपासून ज्येष्ठ कार्यकर्ते नामवंत कायदेपंडित ऍड. के.व्ही.उर्फ केशवराव पाटील, सातारा यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी ' लोकसत्ताकाचा विचार' या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चेत तुकाराम अपराध, दयानंद लिपारे, पांडुरंग पिसे, अन्वर पटेल ,राजन मुठाणे, शकील मुल्ला, देवदत्त कुंभार, सचिन पाटोळे, श्रेयस लिपारे, मनोहर जोशी, आनंद जाधव,शहाजी धस्ते आदींचा सहभाग होता.