प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी / प्रतिनिधी :
गेल्या ६ वर्षात वाढलेली भरमसाठ महागाई , गॅस सिलिंडर बरोबरच पेट्रोल व डिझेल दरवाढ , जीवनावश्यक वस्तूंची वाढ व वहीफणी कामगारांची कमतरता अशा विविध समस्यांचा सामना करत वहिफणी व्यवसाय मार्गक्रमण करत आहे.त्यामुळे हा व्यवसाय सावरण्यासाठी वहिफणी मजूरीच्या दरामध्ये ३० रुपयांची वाढ केल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा व इचलकरंजी वहिफणी असोसिएशनच्या पत्रकार बैठकीत जिल्हाध्यक्ष महादेव गौड यांनी दिली.
शेती व्यवसायाखालोखाल सर्वाधिक रोजगार देणारा व्यवसाय म्हणून यंत्रमाग व्यवसाय ओळखला जातो.यंत्रमाग व्यवसाय व त्याच्याशी निगडित व्यवसायामुळे अनेकांच्या रिकाम्या हातांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. अशीच परिस्थिती वहिफणी व्यवसायाची देखील आहे. परंतू , गेल्या ६ वर्षात वाढलेली भरमसाठ महागाई , गॅस सिलिंडर बरोबरच पेट्रोल व डिझेल दरवाढ , जीवनावश्यक वस्तूंची वाढ व वहीफणी कामगारांची कमतरता अशा विविध समस्यांचा सामना करत वहिफणी व्यवसाय मार्गक्रमण करत आहे. वास्तविक यंत्रमाग कामगारांची मजुरी दरवाढ ही १ वर्षांनी आणि वहिफणी कामगारांची मजुरी
दरवाढ ही ३ वर्षांनी होते.परंतू ,यंत्रमाग व्यवसायातील यापूर्वीची परिस्थिती लक्षात घेवून कोल्हापूर जिल्हा व इचलकरंजी वहिफणी असोसिएशनने वहिफणी कामगारांच्या मजूरीमध्ये दरवाढ केली नव्हती.त्यामुळे आता वहिफणी व्यवसायच विविध समस्यांचा सामना करत मार्गक्रमण करत आहे.त्यामुळे हा व्यवसाय करणारे व्यवसायिक व कामगारांची आर्थिक कुचंबणा होत आहे.आता विविध समस्यांच्या चक्रातून
हा व्यवसाय सावरण्यासाठी शनिवार दिनांक २२ जानेवारीपासून वहिफणी मजूरी दरामध्ये ३० रुपये वाढ करत असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा व इचलकरंजी वहिफणी असोसिएशनच्या वतीने जिल्हाध्यक्ष महादेव गौड यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.तसेच जे यंत्रमागधारक मजुरी दरवाढ देणार नाहीत ,त्यांची वहिफणी लावली जाणार नसल्याचा असोसिएशनचा निर्णय असल्याचे सांगितले.
या बैठकीस असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष राजाराम पोवार , शहराध्यक्ष बंडोपंत मुसळे - कोदले ,उपाध्यक्ष नौशाद सावळगी ,विलास कोरवी ,सुनील कोरवी ,सलिम मोटरवाले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.