प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी ता. २७ समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने त्र्याहत्तराव्या लोकसत्ताकदिनी ज्येष्ठ पत्रकार व इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ ठिकणे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
रामभाऊ ठिकणे व प्रसाद कुलकर्णी यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचनही केले. यावेळी शशांक बावचकर, दयानंद लिपारे ,पांडुरंग पिसे, तुकाराम अपराध,शकील मुल्ला ,शहाजी धस्ते, महालिंग कोळेकर, अशोक माने, सतीश कांबळे, शंकरराव भाम्बीष्टे, भीमराव नायकवडी,अशोक पाटील, संजय डोईफोडे आदी उपस्थित होते.पांडुरंग पिसे यांनी सूत्रसंचालन केले.