प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी--आनंदा शिंदे.
इचलकरंजी नगरपालिका कडून माझी वासुंधरा स्वच्छता अभियान राबविण्यात आले , तसेच स्वच्छतेचे महत्त्व देखील पटवून देऊन या अभियानाअंतर्गत छोटे व्यापारी यांचा देखील या अभियाना मध्ये सहभागी करून त्यांना या अभियाना निमित्त स्वच्छता कायम राखण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली त्याच बरोबर त्यांना कचरा ठेवण्याकरता डस्तबिन इचलकंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते देण्यात आले.
माझी वासुंधरा स्वच्छता अभियान निमित्त याचाच भाग म्हणून डेक्कन भाजी मार्केट मधील छोट्या व्यापाऱ्यांना या भागातील मुकादम श्यामराव जावळे यांच्या हस्ते व्यापाऱ्यांना डस्तबिन देण्यात आले . या अभियान मध्ये सफाई कामगार संजय दावणे दता कांबळे संकेत कांबळे या कर्मचाऱ्यांनी रोज स्वच्छता ठेवून याचा वापर करावा व कचरा रस्त्यावर न टाकण्याचे व या अभियान मध्ये भाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले