प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी : नेक्शजेन आंतराष्ट्रीय फिल्म महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
या वेळी महाराष्ट्र राज्यातील शॉर्ट फिल्म व वेब सिरीज तसेच सिरीयल बनविणारे बेस्ट निर्माता,दिग्दर्शक,सहा दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, संगीतकार, नृत्य दिग्दर्शक, बालकलाकार,कॅमेरामन,साईड कलाकार तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा श्रीमती शशिकला बोहरा मॅडम,सहा.फौजदार मा श्री संजय जधाव(शहर वाहतूक नियंत्रण शाखा इचलकरंजी,मा श्री ए सनदी सर (अध्यक्ष-छत्रपती शासन) यांचे हस्ते बेस्ट निर्माता दिग्दर्शक - प्रकाश भोकरे,बेस्ट अभिनेत्री जोत्सनाराजे गायकवाड, बेस्ट अभिनेता श्री सुरेश कुंभार त्याच सोबत बाल कलाकार, संगीतकार, कोरिओग्राफर, लेखक,अशा कलाकारांसह व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल इचलकरंजी शहरातील सामाजिक कार्यकर्ते मानवाधिकारचे गजानन शिरगांवे यांना आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट समाजसेवक तर सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती निर्मला मोरे मॅडम व कांता बोहरा यांना उत्कृष्ट समाजसेविका,पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्रीमती प्रीती कलडोने यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
यावेळी दिग्दर्शक रमेश रजपूत,अभिनेत्री श्वेता सुतार, अभिनेता अभिजित रोकडे,श्रीमती निर्मला शिरगांवे,श्रीमती सीमा मोरे,असिफ संजापूरे,बजरंग कांबळे,सॅम संजापुरे, सागरभाऊ कांबळे,तसेच अनेक कलाकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.