घातपात कारवायांची माहिती दिल्याबद्दल सरकारने माझा सन्मान करावा : गजानन आंबी

 


प्रेस मीडिया : इचलकरंजी :

इचलकरंजी : केवळ देशालाच नव्हेतर संपूर्ण जगाला बाँम्बस्फोट आणि इतर  घातपात कारवायांचा संभाव्य धोका असणाऱ्या काही अतिरेक्यांची माहिती मी स्वतः ई -मेल किंवा फोनव्दारे अमेरिकेबरोबरच भारत देशाच्या संरक्षण यंत्रणेला दिली असल्याचा दावा गजानन आंबी यांनी आज इचलकरंजीत पत्रकार बैठकीत बोलताना केला.तसेच या कार्याबद्दल भारत सरकारने माझा उचित सन्मान करावा ,अशी मागणी सरकारकडे केल्याचे सांगितले.


इचलकरंजी शहरातील गजानन आंबी यांनी आपल्या सामाजिक कार्याची व अतिरेकी कारवायांच्या संभाव्य धोक्याची माहिती वेळोवेळी भारत सरकारबरोबरच अमेरिका सरकारला दिल्यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आज पत्रकार बैठक घेतली.या बैठकीत त्यांनी१९९३ ते २००२ या काळात मी जाती तोडो, भारत जोडा या मुंबईतील आंदोलनात संपूर्ण सहभाग घेवून महाराष्ट्रभर फिरुन समाज प्रबोधन केल्याचे सांगितले. सामाजिक उपक्रमात भाग घेतल्यानंतर पाकिस्तानपेक्षाही भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला अतिरेकी कारवायांचा अंतर्गत धोका सर्वाधिक असल्याचे जाणवले.

तसेच देशातील सर्वांना समान न्याय देणेसाठी आरक्षण पध्दती रद्द करावी , माणुसकी संपविणारी शिक्षण पध्दती रद्द करावी , इंग्रजांच्या गुलामगिरीचे कायदे रद्द करावेत आदी मागण्या वारंवार राज्य सरकारबरोबरच भारत सरकारकडे केल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी गजानन आंबी यांनी , केवळ देशालाच नव्हेतर संपूर्ण जगाला बाँम्बस्फोट आणि इतर  घातपात कारवायांचा संभाव्य धोका असणाऱ्या ओसाबा बिन लादेन व काही अतिरेक्यांची माहिती मी स्वतः ई -मेल किंवा फोनव्दारे अमेरिकेबरोबरच भारत देशाच्या संरक्षण यंत्रणेला दिली असल्याचा दावा करुन या कार्याबद्दल भारत सरकारने माझा उचित सन्मान करावा ,अशी मागणी सरकारकडे योग्य कागदपत्रांच्या आधारे केली असल्याचे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post