२६ जानेवारी रोजीचा मुख्य ध्वजारोहण समारंभ प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते नगरपरिषद मुख्य इमारतीच्या प्रांगणात करणेत येणार
प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजीचा मुख्य ध्वजारोहण समारंभ प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते नगरपरिषद मुख्य इमारतीच्या प्रांगणात करणेत येणार.
इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षी २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त मुख्य ध्वजा रोहण समारंभ राजाराम मैदान येथे साजरा करणेत येतो. तथापी शासन परिपत्रकानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावाची सद्यस्थिती विचारात घेता दरवर्षी प्रमाणे मोठ्या प्रमाणात प्रजासत्ताक दिन कार्यक्रम आयोजित न करता मर्यादीत स्वरूपात करावा लागणार आहे.
सदर वस्तुस्थिती व सावधगिरीच्या उपाय योजना विचारात घेऊनच यावर्षीचा प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करणे बाबतचे निर्देश शासन स्तरावरुन देणेत आलेले आहेत.
या अनुषंगाने नगरपरिषदेच्या मुख्य ध्वजारोहण समारंभा साठी दरवर्षी राजाराम मैदान येथे होणारी नागरिकांची त्याच प्रमाणें विद्यार्थ्यांची गर्दी टाळून यावर्षी २६ जानेवारी रोजीचा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ सकाळी ८.२५ वाजता नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या शुभहस्ते नगर परिषद मुख्य* *इमारतीच्या प्रांगणात कोव्हिड- १९ च्या सर्व नियमांचे पालन करून अधिकारी- कर्मचारी यांच्या उपस्थितीत करणेत येणार आहे*.