गंगामाई गर्ल्स हायस्कूलची पायल वाघमारे ,राजश्री कामत यांची राष्ट्रीय टँगसुडो स्पर्धेसाठी निवड

 


प्रेस मीडिया ऑनलाइन :

इचलकरंजी / प्रतिनिधी :

नाशिक येथे घेण्यात आलेल्या टँगसुडो स्पोर्ट्स ऑफ महाराष्ट्रच्या राज्यस्तरीय टँगसुडो स्पर्धेत वस्त्रनगरीतील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी पायल लघु वाघमारे हिने १८ वर्षाखालील गटात आणि राजश्री राजेश कामत हिने १४ वर्षाखालील गटात द्वितीय क्रमांक पटकावला.त्यामुळे सदर यशस्वी विद्यार्थीनींची ७ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या टँगसुडो राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशाने वस्त्रनगरीच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे सदर विद्यार्थीनींचे क्रीडा क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.


काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या टँगसुडो स्पोर्ट्स ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हास्तरीय टँगसुडो स्पर्धेतबवस्त्रनगरीतील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनीपायल लघु वाघमारे हिने १८ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक आणि १४ वर्षाखालील गटात राजश्री राजेश कामत हिने द्वितीय क्रमांक पटकावला.त्यामुळे या दोन्ही विद्यार्थीनींची नाशिक येथे राज्यस्तरीय टँगसुडो स्पर्धेसाठी निवड झाली होती.या स्पर्धेतही सदर विद्यार्थीनींनी



विविध गटामध्ये व्दितीय क्रमांक पटकावून यशाची वेगळी चुणूक दाखवून दिली.त्यामुळे त्यांची ७ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या टँगसुडो राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशाबद्दल ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा , चेअरमन हरीश बोहरा , व्हाईस चेअरमन उदय लोखंडे ,ट्रेझरर राजगोपाल डाळ्या, सेक्रेटरी बाबासाहेब वडींगे ,स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर  या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थीनींचे अभिनंदन करुन पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस.गोंदकर , उपप्राचार्य आर.एस. पाटील , उपमुख्याध्यापिका सौ. एस.एस.भस्मे, पर्यवेक्षक व्ही.एन.कांबळे  यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले.या यशस्वी विद्यार्थीनींनाक्रीडा विभाग प्रमुख शेखर शहा , महेश गवंडी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.दरम्यान ,सदर यशस्वी विद्यार्थीनींचे क्रीडा क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post