प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी ता.३ ,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यात उक्ती आणि कृती यांच्यातील कमालीची एकवाक्यता होती.' सारे अनर्थ एका अविद्येने केले ' या सार्वकालिक सत्य अखंडावर फुले दाम्पत्य कार्यरत राहिले. शिक्षणातूनच समाजाचा उद्धार होऊ शकतो आणि आर्थिक दारिद्र्य पासून वैचारिक दारिद्र्य दूर होऊ शकते या विचारांनी ते सदैव कार्यरत राहिले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी एकमेकांना सक्षमपणे साथ दिली.
जोतिबा फुले यांच्यानंतरही सत्यशोधक समाजासह सर्व कामे कविमनाच्या सावित्रीबाई करत राहिल्या.त्यांची ध्येयनिष्ठा अंगी बानवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जन्मदिनी अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.प्रारंभी प्रा.रमेश लवटे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रा.श्याम माने, पांडुरंग पिसे,नौशाद शेडबाळे, प्रा.डॉ.एफ.एन.पटेल,राजन मुठाणे,सौदामिनी कुलकर्णी,नंदा हालभावी, अश्विनी कोळी,गिरीश पाटील, सुनील लोहार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.