२६ जानेवारीला रक्तदान शिबीराचे आयोजन


प्रेस मीडिया ऑनलाइन :

इचलकरंजी / प्रतिनिधी :


सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि रक्ताची गरज ओळखून येथील हटकर कोष्टी समाज युवक मंडळ व एकलव्य प्रतिष्ठानतर्फे बुधवार दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी मोठे तळे, महात्मा गांधी पुतळ्याशेजारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच सकाळी ८ वाजता समाजाचे अध्यक्ष शिवकांत मेत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असून सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर सुरु होणार आहे. तरी या दोन्ही कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हटकर कोष्टी समाज युवक अध्यक्ष अमित खानाज व एकलव्य प्रतिष्ठानचे हेमंत वरुटे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post