प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : शासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांची शहरात प्लास्टिक बंदी विरोधात अचानक धडक मोहिम राबविण्यात आली.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने माजी वसुंधरा अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे या अनुषंगाने आज दि.२८/१/२०२२ रोजी प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी इचलकरंजी शहरातील गांधी पुतळा ते जनता चौक दरम्यान अचानक पणे प्लास्टिक बंदी विरोधात धडक मोहीम राबविली आली आजच्या या मोहिमेत जवळपास २७ दुकानदार, व्यावसायिक व फेरीवाले यांच्या कडून एकूण २३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि एकूण २८३०० रू. ची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
त्याच बरोबर या पुढे प्लास्टिक विरोधात अशी मोहीम सुरू राहणार असल्याने सर्व छोटे व्यापारी,दुकानदार यांनी प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले आहे.
आजच्या या मोहिमेत मुख्य स्वच्छता निरीक्षक सुर्यकांत चव्हाण, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे,स्वच्छता निरिक्षक रफिक पेंढारी, मंगेश दुरुगकर,कल्पना देसाई, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांचसह आरोग्य आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.