प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहर व परिसरात विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेला ,एस.टी. सरकार गँगचा म्होरक्या माजी नगरसेवक संजय तेलनाडे याच्यावर दुहेरी मोका अंतर्गत केलेल्या अटकेच्या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्राला मोठा हादरा बसला आहे.त्याला आज रविवारी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, न्यायालयातील सुनावणी झाल्यानंतर संजय तेलनाडे याला न्यायालय ते महात्मा गांधी पुतळ्या पर्यंत पायी चालवत नेले.
इचलकरंजी शहर व परिसरात माजी नगरसेवक संजय तेलनाडे याने संघटीत गून्हेगारीच्या माध्यमातून खंडणी ,खून ,खूनाचा प्रयत्न ,मटका, लॅण्ड माफिया ,क्रिकेट बेटींग, सामुहिक बलात्कार आदींसह विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे करत मोठी दहशत निर्माण केली होती. त्यामुळे पोलीस खात्याने त्याच्यासह त्याचा थोरला बंधू माजी नगरसेवक सुनील तेलनाडे व अन्य काही जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते.यामध्ये
गुन्हे दाखल असलेला एस.टी. सरकार गँगचा म्होरक्या माजी नगरसेवक संजय शंकर तेलनाडे, सुनिल शंकर तेलनाडे या दोघा बंधूसह एस.टी. सरकार गँगवर दोनदा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजे 2019 पासून तेलनाडे बंधू हे फरारी झाले होते. त्यांचा पोलिस खात्याकडून सर्वतोपरी शोध घेण्यात येत होता. अखेर तब्बल 34 महिन्यांनतर फरारी संजय तेलनाडे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. पुणे परिसरातील आंबेगाव येथे तेलनाडे याला शनिवारी मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून रात्री उशीरा कोल्हापूरात आणण्यात आले. तेलनाडे याला अटक केल्याची माहिती गुन्हेगारी क्षेत्रात समजताच मोठी खळबळ उडाली आहे.पोलिसांनी अटक केलेल्या संजय तेलनाडे याला आज रविवारी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात प्रचंड पोलिस बंदोबस्तात हजर करण्यात आले.
For Latest News Update : Follows On Whatsapp, Facebook, Twitter.
दरम्यान , त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याच्या वृत्ताने समर्थक कार्यकर्त्यांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी दक्षता घेत गर्दी होऊ दिली नाही. तर न्यायालयात परिसरात जमणार्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने अनेकांनी तेथे येणे टाळले. तेलनाडे याला न्यायालयात आणण्यात आल्यानंतर परिसरात असणार्या सर्वांनाच पोलिसांनी तेथून पांगविले.यावेळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
या सुनावणीनंतर तेलनाडे याला पोलिसांनी न्यायालयापासून ते महात्मा गांधी पुतळा चौकापर्यंत पायी चालवत नेले. तेथून गाडीतून त्याला कोल्हापूरकडे नेण्यात आले.संशयित आरोपी तेलनाडे याला पायी नेण्यात येत असताना रस्त्याकडेला असणार्या काही उत्साही नागरिकांकडून त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केले जात होते. हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्या सर्वांना बोलावून घेत समज देऊन चित्रीकरण डिलीट केले. न्यायालयात पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रमोद जाधव, किरण भोसले, शिवाजीनगरचे महादेव वाघमोडे, गावभागचे राजू ताशिलदार आदी उपस्थित होते.