इचलकरंजी : आनंदा शिंदे...
इचलकरंजी : केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने ओबीसींच्या फार मोठा अन्याय केला आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये वेळेत डेटा हजर केला असता तर ओ बी सी ना स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओ बी सी जाती आधारे ओ बी सी प्रतिनिधी ना वाव मिळाला असता. दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षण न टिकल्या मुळे ओबीसींच्या वर फार मोठा आघात झाला आहे.
शिक्षण नोकरा मध्ये देखील पुढे धोका निर्माण होणार आहे म्हणून ओ बी सी सर्व नेते सह कार्यर्कत्यांनी एक संघ रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे तरच आपला न्याय मिळेल.
केंद्रं सरकार व महाराष्ट्र सरकार ओ बी सी नेत्यांना काहीतरी गाजर दाखवून ओबीसी चा लढा मध्ये फूट पाडण्याचा कुटिल कारस्थान रचला आहे ओ बी सी चा कार्यकर्ते ने पुढे येऊन हा लढा दिला पाहिजे.२०२२ ओ बी सी जातवार जनगणना होणारा मागणी करिता जन मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
ओ बी सी सरचिटणीस श्री दिगंबर लोहार व कोल्हापूर लायन क्लब चे अध्यक्ष श्री मोहन हजारे प्रथम इचलकरंजी येथे आगमन होताच संत गाडगे महाराज चॉरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री आनंदराव शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार त्यांच्यात करण्यात आला . या प्रसंगी डोंबारी समाजाची ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत जावळे व अशोकराव लाखे हे हजर होते. ट्रस्ट सचिव श्री प्रकाश शिंदे यांनी आभार मानले.
बुधवार दिनांक ५/१/२०२२
ठिकाण: वैश्य वाणी समाज बोर्डिंग शाहूपुरी हॉटेल त्रिवेणी जवळ कोल्हापूर.
वेळ सकाळी ठिक ११ वाजता..
ओ बी सी सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला हजर राहण्याचे असे आवाहन सरचिटणीस श्री दिगंबर लोहार शेवटी केले....