प्रेस मीडिया ऑनलाइन :
शिवकुमार मुरतले (सर) :
इचलकरंजी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ग्रुपच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून *विनम्र अभिवादन* करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ.गीता भागवत यांनी केले. प्रमुख पाहुणे यांचा परिचय सौ संजीवनी हरीहर यांनी केले. प्रमुख पाहुणे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन श्रीराम आडकी यांनी केले. प्रमुख वक्ते *इचलकरंजी नागरी मंच* अध्यक्ष श्री.अभिजीत पाटवा* यांच्या शुभहस्ते तेच कोल्हापूर येथे झालेल्या कला, साहित्य, सामाजिक, लोकसंवाद प्रतिमा संमेलनाच्या वतिने इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटरच्या मार्फत श्री शिवकुमार इराण्णा मुरतले सर यांना त्यांनी केलेल्या विविध सामाजिक शैक्षणिक उल्लेखनीय कामाबद्दल *भारत प्रतिमा गौरव पुरस्कार 2021* हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व प्रमुख पाहुण्या कला शिक्षिका सौ *नीता सुतार* मॅडम यांना महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाच्या महिला संघटिका म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ग्रुपचे अध्यक्ष सौ.गीता भागवत यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष *सुभाष घट्टे* उद्योजक यांचा सत्कार लक्ष्मण पाटील सर यांनी केले.
या प्रसंगी ग्रुपच्या अध्यक्षा सौ.गीता भागवत,सचिव विजय माळी खजिनदार लक्ष्मण पाटील सर व सदस्या सौ कविता शिंगाडे, सरिता पांडव,अमिता बिरंजे, विजया पाटील, अनिता माने, संजीवनी हरिहर व ज्योतिबा पांडव, राम आडकी व शिवकुमार मुरतले इत्यादी ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. प्रत्येकानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे विचार मनोगतातून मांडण्याचा प्रयत्न केला.*सावित्रीच्या लेकी आम्ही मागे आता राहणार नाही*. हा सर्व कार्यक्रम सौ कविता शिंगाडे मॅडम यांच्या घरी घेण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लक्ष्मण पाटील सर यांनी केले व शेवटी आभार सरिता पांडव मॅडम यांनी केले.