प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी : शासनाने राज्यात विना प्रेक्षक कुस्ती मैदाने भरवण्यास परवानगी द्यावी ,या मागणीसाठी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अम्रुत भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या वतीने मुंबईत सिल्वर ओक येथे नुकतेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष ,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले.यावेळी त्यांच्याशी झालेल्या भेटीतील चर्चे दरम्यान खासदार शरदचंद्र पवार यांनी राज्यात विना प्रेक्षक कुस्तीची मैदाने भरवण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल ,असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले. या भेटीसाठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील काही वर्षांपासून यात्रा ,उरुस या निमित्ताने भरवण्यात येणा-या कुस्तीच्या मैदानांवर राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक तालमी बंद पडल्या आहेत. परिणामी ,अनेक
मल्लांचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच कुस्ती क्षेत्राच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची भिती जाणकारांमधून व्यक्त होत आहे.याच अनुषंगाने राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अम्रुत भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या मध्यस्थीने राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. यावेळी पैलवान अम्रुत भोसले यांनी शासनाच्या घातलेल्या बंदीमुळे कुस्ती मैदाने भरवण्यात येत नसल्याने मल्लांचे होत असलेले मोठे नुकसान विविध उदाहरणांव्दारे खासदार शरदचंद्र पवार यांना पटवून दिले. यावेळी खासदार शरदचंद्र पवार यांनी राज्य शासनाकडून विना प्रेक्षक कुस्ती मैदाने घेण्यासाठी परवानगी मिळवून देण्यात येईल ,असे आश्वासन दिले.
यावेळी अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यासह महिला मल्ल व अन्य उपस्थित होते.