प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी : ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा इचलकरंजी येथे शाखा कार्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा जयंतीचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ , ग्राहक पंचायतीचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व ग्राहकतीर्थ मा.बिंधु माधव जोशी (नाना) यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने झाली.
प्रत्येक घरातल्या मातेने छत्रपती शिवाजी महाराज सारख्या पुत्राला जन्म देऊन त्या पुत्रावर शिवाजी महाराजांच्या सारखे संस्कार करणे, त्याला घडवणे देखील तितकेच गरजेचे आहे अस वक्तव्य त्यांनी केले.
तरी स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित किस्से सांगत शिकागो येथे झालेल्या धर्मपरिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी केलेल्या नेतृत्व तसेच त्यांचे असणारे अफाट वाचन व ते जसेच्या तशे लक्षात ठेवायची त्यांची शैली व त्यांच्या घडलेल्या गोष्टीं पटवून देत त्यांच्या अंगी प्रामुख्याने असणारी जिद्द व चिकाटी,सातत्य हे गुण ग्राहक पंचायतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने अंगीकारावे जेणेकरून आपले देखील प्रत्येक कार्य हे कौतुकास्पद व समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल आणि तीच खरी या थोर व्यक्तिमत्वाना आदरांजली ठरेल असे मत सुरेंद्र दास यांनी मांडले.
Follow us on : व्हॉट्सॲप ,फेसबुक , ट्विटर , टेलिग्राम.
कार्यक्रमाचे आभार शाखेचे कायदेविषयक सल्लागार अक्षय शिरगुप्पे यांनी मांडले.!
यावेळी शाखेचे सचिव-सुरेश सारवाडे, कोषाध्यक्ष-संजय शिरडवाडे, संघटिका-सौ.संजीवनी हरिहर,विजया माळी, सदस्य- अविनाश वासुदेव, आर.बी.व्यास,प्रसिद्धी विभाग प्रमुख-सारंग दास आदी उपस्थित होते.